Ad will apear here
Next
आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट मालिकेत वाडेकर वॉरियर्स करणार भारताचे प्रतिनिधित्व
पहिली आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट मालिका इंग्लंडमध्ये
आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाडेकर वॉरियर्स संघातील खेळाडू व पदाधिकारी

ठाणे : जगातील सहा देशांमधील दिव्यांग खेळाडूंसाठीची पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इंग्लंड येथे होणार असून, या मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व वाडेकर वॉरियर्स हा संघ करणार आहे. 

ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज्ड या संस्थेने (एआयसीएपीसी) हा १६ खेळाडूंचा संघ निवडला आहे. हा संघ तीन ते १४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत इंग्लंड येथे होणाऱ्या पहिल्यावहिल्या जागतिक क्रिकेट मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. हे खेळाडू ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे दिवंगत कप्तान अजित वाडेकर यांनी ३० वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली आणि त्यासाठी मेहनत घेतली होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संघाला वाडेकर वॉरियर्स हे नाव देण्यात आले आहे. 

देशभरात दिव्यांगांसाठी होणाऱ्या रणजी सामन्यांमधून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाने नुकतीच अफगाणिस्तानबरोबर झालेली मालिका जिंकली आहे. दिव्यांग क्रिकेट विश्वात अफगाणिस्तान आणि भारत हे संघ नावाजलेले मानले जातात. त्यामुळे हा विश्वचषक भारताला मिळेल, अशी आशा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

या खेळाडूंना या मालिकेसाठी शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वाडेकर यांच्या कन्या कश्मीरा वाडेकर यांनीही या संघाला शुभेच्छा दिल्या. ‘आपल्या वडिलांच्या या कार्याबद्दल आपल्याला अभिमान आहे,’असे त्यांनी या वेळी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZHRCC
Similar Posts
‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करणे हे सरकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य’ ठाणे : ‘तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सरकारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासकीय सेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ ठेवून
‘आधुनिकतेने हिरावले संस्कार’ ठाणे : ‘माणसांनी तांत्रिक बाबींमध्ये प्रगती केली खरी; पण त्याचसोबत गेल्या काही वर्षांपासून आलेल्या आधुनिकतेने आपल्यातील संस्कार हिरावले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियामुळे देशाचे भविष्यनिर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीसह आपल्याही संवेदना, गांभीर्य कमी होत आहे,’ अशी खंत ‘तारक मेहता
१७व्या लोकसभेत विक्रमी ७८ महिला खासदार नवी दिल्ली : राजकारणात महिलांचा टक्का वाढताना दिसत असून, नुकत्याच झालेल्या १७व्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ७२४ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते; त्यापैकी ७८ जणींना खासदारपदाची संधी मिळाली आहे. लोकसभेतील महिला खासदारांची ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. त्यापैकी ४१ महिलांनी या आधीही खासदारपदाची जबाबदारी सांभाळली आहे
ठाणे खाडीच्या प्रदूषणमुक्ततेचे संकेत ठाणे : गेल्या काही वर्षांत ठाणे खाडी प्रदूषणाच्या गर्तेत अडकल्याचे चित्र दिसत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे या खाडीची प्रदूषणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नुकतेच या खाडीत दोन श्वानमुखी सर्प आढळले. हे निमविषारी सर्प मध्यंतरीच्या काळात या खाडीत दिसत नव्हते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language